Ad will apear here
Next
नवले महाविद्यालयात संविधान दिन साजरा

कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी संविधानाची गरज, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संविधानाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. महादेव वाघमारे यांनी दैनंदिन जीवनात, तसेच देशाची जडणघडण व विकासामध्ये संविधानाचे कार्य, महत्त्व स्पष्ट केले. 
कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. 

प्रास्ताविक डॉ. नितीन जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राजेश कांझाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. सतीश सोनावणे, इतर प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZQMCG
Similar Posts
‘सूर्यदत्ता’च्या सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अॅचिव्हर’ पुरस्कार पुणे : शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘एशिया-अरब समिट अँड अॅवाॅर्ड्स’मध्ये ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अचिव्हर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच संस्थेच्या तीन इन्स्टिट्यूट्सना सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
मीमांसा प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी प्राज आणि ‘आयआयएसईआर’चा करार पुणे : गेल्या १२ वर्षांपासून ‘आयआयएसईआर’तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या मीमांसा या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या विस्तारासाठी यंदा प्राज इंडस्ट्रीज आणि ‘आयआयएसईआर यांनी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार प्राज या स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांसाठी तांत्रिक, तसेच आर्थिक सहाय्य देईल.
सूर्यदत्ता ठरला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुणे : माय ब्रँड बेटर आयोजित ‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अॅवॉर्ड्स २०१९’मध्ये सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट’ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language